वार्ता ही झाली दशदिशा
केला दु:खाचा माझ्या तमाशा ।
नाही कुणाचे कोणी यात
जमती पाहण्या हा तमाशा ।
येती कित्येक दूरुनी येथे
त्यांचसाठी असे हा तमाशा ।
नसे चिंता मनी कुणाच्या
हसती ते पाहूनी हा तमाशा ।
असती व्यथा कोणास किती
न स्मरती पाहता हा तमाशा ।
नायिका असे जरी मी यात
जीवघेणा खेळ होतो हा तमाशा ।