मैत्री म्हणजे काय???
आपुलकी , ओढ , आस्था, कि........त्याहीपलिकडले ......
मनाच्या आणि ह्रदयाच्याही....पलिकडे
वास्तवतेत जगणार सत्य????
मैत्री , न तुटणार बन्धन
अस्तित्वात असणारी वास्तवता
तरिही......सामाजिक बन्धनाना तोलणारी
सुवर्णतुला......सुवर्णतुलाच नाही का????
मैत्री, मनान्ना जोडणारा सेतू
दोन वेगळ्या वळ्णान्ना जोडणारा हमरस्ता
रस्त्यालगतचा माईलस्टोन......
आठवणीत राहाणारा............ .........
मैत्री, पुनवेचं...शुभ्र चान्दणं......
माझे तुला दोन शब्द
तुझे मला दोन शब्द
चादण्या समज़ुन मुठित दडवायचं......
मैत्री, रिमझिमणारा पाऊस
ट्पट्पणारे ओले थेम्ब..........
कधी आलं आभाळ भरुन तर
तर पावसासंगत बरसायचं............ ...
मैत्री, शब्दान्नाही माहित नसलेली कथा
भावनान्नाही न जाणवणारी विवशता
मैत्री.....प्रेमाच्याही पलिकडले गोड गुपीत.....
मैत्री..सु:ख-दु:ख जोपासणारी..मना-मनान्ची व्यथा...........