दोस्त हो!

दोस्त हो! "मी कोण आहे?" हे कधी कळणार नाही

प्रश्न आहे कठिण तरिही दूर मी पळणार नाही

आजवर प्रत्येक वेळी वेगळा मी वागलो

"कोणता आहे खरा मी?" शोध घ्याया लागलो

-अनील बोकील