पाऊस

तुफान पाऊस पडतोय ......

तुला वाटत असेल

छान बाहेर पडावं

भिजून चिंब होत

पाणी उडवत

गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं....

हो ना?

अरे हो म्हण ना,लाजायचं काय त्यात ?

प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!