भरलेली सिमला मिरची

  • वेगवेग़ळ्या रंगाच्या मोठ्या सिमला मिरच्या ( हिरवी,लाल,पिवळी)
  • बटाटे,हिरवी मिरची,कांदे,कोथिंबीर,आले,लसुण चवीनुसार
  • हळद,हिंग,मोहरी,तेल
३० मिनिटे
३-४ जण

१.सर्व बटाटे उकडुन व कुस्करुन घ्यावे.

२.कांदा एकदम बारीक चिरून घ्यावा.हिरवी मिरची,कोथिंबीर देखील बारीक चिरावे.आल्या-लसणाची पेस्ट करुन घ्यावी.

३.कढईत तेल गरम करुन त्यात हळद व हिंग घालावे,त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व कांदा घालावा व कांदा बदामी होईपर्यंत परतावे.

४.मग त्यात आलं-लसणाची पेस्ट घालुन परतावे आणि त्यात उकडलेला बटाटा ,मिठ व कोथिंबीर घालावी व थोडावेळ झाकुन शिजवावे.

५‌. सर्व सिमला मिरच्या मधोमध चिरून त्यातील सर्व बिया काढुन टाकाव्या.

६.वर बनविलेली भाजी अशाप्रकारे अर्ध्या केलेल्या सर्व मिरच्यांच्या तुकड्यात  भरावी.

७. कढईत पुन्हा तेल गरम करुन त्यात वरील भरलेल्या सर्व मिरच्या हलकेच परतुन घ्याव्या व नंतर १०-१५ मिनीटे मंद आचेवर शिजवाव्या(मऊ होइपर्यंत)

८. सर्व्ह करताना वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या गोल लावुन प्रत्येक मिरचीवर कोथिंबीरीचे पान ठेवुन सजवावे.

सिमला मिरची परतताना खुप हलक्या हाताने परतावी म्हणजे भाजी कढईत पडुन मिरच्याना बाहेरुन लागत नाही.

पार्टीसाठी हा पदार्थ फार छान दिसतो.

माझी वहिनी