नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
अलगद पापण्यांवर विसावणारे
गालावरुन ओघळता-ओघळता
ठीपकत थरथरत्या हाती स्थिरावणारे
नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
ज्याकरीता उधळु वाटे सर्वस्व जिवनाचे
सहकार्य तर नेहमी यास कोमल भावनांचे
एकदतरी आपल्या पावसात चिंब भिजवु पाहणारे
नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
मोत्यासाठी तर असतात लाखो तरसणारे
पण क्षुल्लक वाटे ज्यापुढे मोल असंख्य मोत्यांचे
आपली अमुल्यता कायम टिकवीणारे
नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
पहाटे जे रुप घेई निर्मळ दवांचे
खुलवी जे सौंदर्य हिरव्या पानाचे
कमी वाटे ज्यापुढे देखणेपण फ़ुलाचे
नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
एखाद्याच्या आठवणीने व्याकुळ होणारे
दुराव्याच्या जणिवेने ओघळण्या बैचैन होणारे
कधी कधी होते काळीज भेदणारे
नयनी बरसणारे ते थेंब आसवांचे.............
सचिन काकडे [जुलै १०,२००७]