आनंदचा तो सुर्य जणू आज लवकरच मावळला
माझ्या या अवस्थेवर लाखो चांदण्यासोबतचा
पोर्णिमेचा तो चंद्र चिडवत हसला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................
आज तुझ्याबरोबर चालताना
तुझी साथ अनोळखी वाटु लागलीये या मनाला
आता तु माझी नसतानाही तुझं
अजुनही माझ्या स्वप्नात येणं अजब वाटतय मला
तुझी आत्ताची ती भेदक नजर घरं पाडी काळजाला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................
आज पुन्हा वेदनांच वादळ सुटलयं
सोबत भावनेचा धुराळाही उडाला
पुन्हा या मनाच ते स्वप्न कुठतरी भटकलयं
समजाऊन दमलोय या वेड्या मनाला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................
पुन्हा सतावती मला तुझ्या आठवनी
पुन्हा त्या न संपणा-या रात्री
बघ आलय आता या डोळ्यात पाणी
आज पुन्हा तो वेदनेचा पाऊस बरसला
आज पुन्हा आपल्यातला दुरावा जाणवला.................
सचिन काकडे [जुलै ११,२००७]