आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
कधी हे सहज उलगडले तर कधी याने रात्रभर जागवले
कधी डोळ्यांना आसु दिले पण हे स्वत: मात्र बिनधास्त हसले
आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
कधी अचानक समोर उभे राहिले
तर कधी मनातुन मांजर पावली आले
याच्या खेळात कधी आयुष्यच भटकले
आहे याच्यात किती ताकद
याने गर्वाने ते नेहमी सांगितले
आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
कधी प्रेमाच्या नात्यात हे सहज उलगडले
तर कधी उलगडायला जाता ते अजुनच अवघडले
कधी कधी प्रेमाच्या नात्यानां याने मुद्दाम तोडले
तर कधी नकोश्या नात्यांना याने मनाविरुद्ध जोडले
आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
कधी याने आपल्याला हवे तसे ध्येय दिले
ध्येयाचा मार्ग सापडल्यावर कधी तर याने ध्येयच बदलले
जवळ असल्यावर याने नेहमी दुख: दिले
पण दुर गेल्यावर याचे खरे महत्व जाणवले
आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
अधु-या कहाण्यांसारखे हे उमजु नाही शकले
सावल्यांचा खेळ याचा कोणी समझु नाही शकले
तेच हे कोडे जे प्रत्येकाला पडले
आयुष्याच्या कोड्याने नेहमीच सतवले
याला सोडवण्याच्या प्रयत्नात भले भले फ़सले
सचिन काकडे [जुलै १२, २००७]