हे जग नश्वर आहे ईथे असच चालणार
नियतीच्या कालचक्राला कसं कोण थांबवणार?
हे कालचक्र आहे जे दोन चाकावर चालते
एक ते जीवन दुसरं ते मरण असते
एखादा जन्माला आला
म्हणजे तो कधी ना कधीतरी जाणार
हे जग नश्वर आहे ईथे असच चालणार
हे कालचक्र आयुष्याच खेळ खेळते
त्यात कधी जीवन तर कधी मरण हरते
एखादी दिवा पेटवला
तर काही काळाने का होईना
पण कधीनाकधी तरी विझणार
हे जग नश्वर आहे ईथे असच चालणार
जीवनापुढे मरण आणि
मरणापुढे जीवन धावते
कधी जीवन मराणावर
तर कधी मरण जीवनावर हसते
कळी बनुन उमललेले फ़ुल
कधी ना कधी तरी कोमेजणार
आयुष्य म्हणजे चमकता तारा
तो कधी ना कधीतरी तुटणार
हे जग नश्वर आहे ईथे असच चालणार
नियतीच्या कालचक्राला कसं कोण थांबवणार?
सचिन काकडे [जुलै १३,२००७]