विरह ओळी आणि विडंबन चारोळी...

विरह ओळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!

आणि विडंबन चारोळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...

बंड्या...