पाण्यावर तळलेले अंडे

  • २ अंडी
  • १ कप पाणी
  • मीठ, मीरपूड चवीप्रमाणे
१५ मिनिटे
एकट्यासाठी

एका पातेल्यात कपभर पाणी घेऊन विस्तवावर ठेवा.

पाण्याला उकळी येताच, त्यात दोन्ही अंडी फोडून घाला.

विस्तवाची आंच मंद करून दोन मिनिटे तसेच पाणी उकळू द्या.

पाणी गाळून टाका.

अंड्यांवर चवीप्रमाणे मीठ-मीरपूड टाका.

न्याहारीसाठी  पौष्टीक (तेलविरहीत), चविष्ट आणि झटपट पदार्थ तयार !!

नाहीत

स्वप्रयोग