अवकाश नेत्रीचे
काठिन्य जळाचे
बहरते रात्र, अबोल.
सूक्तांचे आरव
चेतनेचे आर्जव
देहाचे ध्यास, अखंडित.
मंगलाची कामना
अस्थिर मानस
जोडतो हात, भयापोटी.
उद्ध्वस्त तरु
उद्ध्वस्त किनारा
हाकारतो नाव, वंशासाठी.
पाठीचे पोटी
उत्तरे गोमटी
सर्वज्ञ म्हणा, नाईलाज.
बुद्धीच्या ज्वाळा
तापाचे अवसान
तेवत नाही, प्रकाशगर्भ.
वायूचे मैत्र
दिशांचे सूत्र
अनित्य स्थान, दिगंतर.