जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............


जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते

मन चांदण्यात न्हावुन निघते

आशेच्या पावासाळी सरीने

डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते

माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर

तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते

जणु श्रावणातली पहीली सर बरसते

तुझ्या आठवणींच्या सरीने

कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला

मग नवी पालवी फ़ुटते

रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली

शांत चांदणी जणु पुन्हा चमकते

माझी नजर मग

त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे

तु नाही तर तुझी आठवण तरी येते

कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

सचिन काकडे [जुलै १७,२००७]