भेट ठरली होती त्यांची ....

का हसले नभ, बघूनही धरेला

होते कुठे रूप त्याला जे लाभले तिला.

मिलनाची आशा होती तरीही त्याच्या मनाला

भेट ठरली होती त्यांची ....केव्हा तरी क्षितिजाला.........

भिजुनी उन्हात ती, तळपत होती ग्रीष्मात

श्वास रोकून थांबले, नभ निरभ्र मनात

धावूनि गेले ते तिला, सूर्या पासून झाकायला

भेट ठरली होती त्यांची ....केव्हा तरी क्षितिजाला......

श्रावणात त्याच्या मनात मेघ दाटले जणू

जोडण्यासाठी त्यांना आले एक इंद्रधनू

थरारून नभातून वीज अवतरली मावळतीला

भेट ठरली होती त्यांची ....केव्हा तरी क्षितिजाला.......

का उदास झाले नभ, बघूनही धरेला

होत होती मानवांमुळे तिची दुर्दशा क्षणा क्षणाला

आशा तरीही होती सुखाची मनाला

भेट ठरली होती त्यांची ....केव्हा तरी क्षितिजाला.....