उगवली चैतन्य पहाट ज्या क्षणी..........


उगवली चैतन्य पहाट ज्या क्षणी
खुलले सगळे तिमीरपाश..............

ऊजळले तेव्हा विस्म्रुत घन
अन ऊजळला तो अंधार
सापडला मनास नवा आधार
निराशेचा तिथं तेव्हा गुदमरला श्वास
उगवली चैतन्य पहाट ज्या क्षणी
खुलले सगळे तिमीरपाश

झाले निर्गुणही सगुण त्या क्षणी
धरली हाती त्यांनी पुण्याची मग कास
शब्दांनी मग विणले सुगंधी हार
पुष्प-सुमने अर्पित त्या चरणी
खुलले हर्षीत मनीचे द्वार
उगवली चैतन्य पहाट ज्या क्षणी
खुलले सगळे तिमीरपाश

उदास, एकट्या, वातीच्या मनी
विझत चालली जगण्याची आस
उजळलेल्या त्या पहाटेच्या
नव्या किरणांनी बरसवला
मग नवा उल्हास
दिली मग त्याने त्या वातीलाही
नव्या जीवनाची नवी आस
उगवली चैतन्य पहाट ज्या क्षणी
खुलले सगळे तिमिरपाश

सचिन काकडे [जुलै २१,२००७]