मी "थांब" म्हणालो त्याला

मी "थांब" म्हणालो त्याला

आवाज माझा ऐकताच

तो जागच्या जागीच थांबला

क्षणभर माझं भानंच हरपलं

पाहुन त्याच्या चालण्याला

सुख-दुख:, नाती गोती सगळ्यांच्या

ओझ्याने तो पार थकलेला

तेव्हा पाहुन त्याच्या थकव्याला

आवाज मी त्याला दिलेला………..

पण….. नंतर

विचार मनात आला

थांबुनतरी मिटेल का सगळा थकवा त्याचा ?

चालत राहणं हा धर्म आहे “जीवनाचा”

म्हणुन मग थांबवण्यापेक्षा

चालण्यास थोडा उत्साह देऊया त्याला

पण……. हे आधी उमगलंच नव्हत मला

म्हणून

मी "थांब" म्हणालेलो त्याला

आवाज माझा ऐकुन

तो जागीच थांबलेला…………………

सचिन काकडे [जुलै २२,२००७]