मनातली दुख्ख: मनामध्येच सलतात,
जेंव्हा आपलीचं माणसं रूतुंसारखी बदलतात.
माणसांच हि दोष नसावा आपलंच काहितरी चुकलं असेल.
आपल्याच कर्माने दैवं नक्किच रुसल असेल.
न्यायदेवतेसारखं दैवहि आंधळं असेल का ?
न पहाता सारं जीवन त्याला दिसत असेल का?
आम्हिहि केली होति जीवापाड मैत्रि कुणावर.
भेटिखातर मिळाले घाव खोल मनावर.
क्षणभंगुर हि नाति सारी क्षणभंगुर हि माया.
प्रेम मैत्री शब्द नाटकी , इथे सर्वहि वाया.
आयुष्याच्या बाजारात बरंच काही शिकावं लागतं.
शिकण्यासाठी माणसाला इथं मनं मात्र विकावं लागतं
केदार ...