टु बी ऑर नॉट टु बी
जगावं की मरावं...
हा प्रश्नच नाही !
मरेपर्यंत तर जगायचं आहेच.
पावला पावलावर विचार करायचा
विचार करून प्रत्येक पाऊल टाकायचं
भविष्याचा सांगोपांग विचार
भुतकाळाचे धडे
आप्त स्वकीयांचा विचार
मागचा,
पुढचा .
...की फ़ेकून द्यायचं
झोकून द्यायचं स्वतःला
पसरायचॆ पंख सताड
आर
किंवा पार
सगळ्या क्षुद्र विचारांना
मुठमाती द्यायची
आणि बनायचं हिमालयासारखं विशाल
सतत वाहाणा-या चिंतांचा बर्फ़ करायचा
आणि बर्फ़ा्ची बनावी हिमनदी
सारे कडे तोडून फ़ोडून
ध्वस्त करणारी
चल
उधळ चौखूर
फ़ेक घोडा
सूट बेछूट
पसर पंख
पसर !