चित्रपट गृहातला विनोद.

मी आणि माझ्या पेक्षा मोठा माझा आतेभाऊ-बबलू, आम्ही दोघे 'चोरी चोरी चुपके चुपके' सीनेमा बघायला गेलो होतो. मी त्यावेळी लहान होतो, पण इतक माहीत होते कि तो दोनदा नापास झाला आहे.

                   सीनेमा चालू होता. एका प्रसंगात राणी मुखर्जी गरोदर असते आणि अपघाताने जीन्या वरून खाली पडते. तिला तातडीने दवाखान्यात नेतात. डॉक्टरांचा रीपोर्ट येतो, की तीचा गर्भपात झाला आहे. सगळीकडे चिडीचुप शांतता पसरलेली होती. प्रेक्षक गंभीर झाले होते. एवढ्यात बबलू पचकला-'अरेरे, बिचारीचे वर्श वाया गेले'.