आयुष्याची गाडी १

आयुष्याची गाडी कधीच

सरळ जात नसते

मार्ग  असेना जरी वेडा वाकडा

तरी अंतीम स्टेशन ज्ञात असते  ...१

वाटेवरच कधी कधी

धुके असते एकदम दाट

समोरचे दिसत नसतानाही

शोधावीच लागते वाट         ....२

कधी मधे लागेल बोगदा

तर कधी निळे अवकाश

म्हणून ताबा ठेवुन जावे कधी प्रचंड वेग

तर कधी सावकाश           ....३