'शोध'

सकाळपासुन
सूर्यासंगे
चालत गेलो...
सदैव दोघे
एकामेकां-
सोबत गेलो...

थकला तोही
संध्याकाळी
आणि थांबला...
बघता-बघता
क्षितिजामागे
क्षणात लपला...

एकटाच मी
तेव्हापासुन
परतत आहे...
पुन्हा उन्हाला
चांदण्यात मी
शोधत आहे...