भाव चिंतन -४

स्वागत

आकाशी नौबती झडझडल्या

लेऊनि जल आनंदे

अवनीवर अवतरल्या II

स्वागतं ते, स्वागतं ते

आदरणीय अतिथे...

दुमदुमले शब्द घुमले 

कृतज्ञतेच्या वाटे II

दमला मानव श्रमला

व्यर्थ भूमिपुत्रदास

कृपाचि परि सरली

वाटतसे  त्यास II

कृशावले ओहळ निर्झर

भूमातेचे दूत

तृणांकुरही लोपावले

मातीतुन ना येत II

मालवले जणु दिव्य दीप

ते दुर्लभ आशेचे

जीवन सरले मृत्युपथे

या प्राणिजगताचे II

परी एक सांजवेळी

तरारली ती कांती

इष्ट अतिथी आरुढ झाला

जलधारेवरती II

-रा. वा. गुणे