कशासाठी?

करा थोडा विचार करा
हे सारे  कशासाठी?
कठपुतळ्यांनो..
विचार करा

नटवणारा कोण तो?
नाचवणारा कोण तो?
तुमचे काय? त्याचे काय?

समाधान मानू नका
मिळणाऱ्या टाळ्यांवर
तुमच्या नाहीत त्या

तुमचा आहे अंधार
पडद्यामागचा
तो बरा की दोरीला लटकत
लोंबकळत जगायच?

हा निर्णय
कळसुत्रीबाहुल्यांना घेता येत नाही..
ह्यामुळेच तर खेळ सुरु असतो