वाचन संस्कृती

मी कनेक्टीकेट(अमेरिका)राज्यातील मंचेस्टेर या शहरात एक महिना आहे.येथील व्हायटन लायब्ररी अतिशय समृद्ध असून इंग्रजी पुस्तके आणि चित्र-फ़िती कसलीही वर्गणी वा अनामत न घेता,फ़क्त ओळख पटविल्यावर दिल्या जातात.एका वेळी एका सदस्याला आठ चित्र-फ़िती वपुस्तके ही दिली जातात.पुस्तकाच्या पानांची स्संख्या विचारात घेऊन दोन महिन्या पर्यंत मुदत दिली जाते. अशा प्रकारची वाचनालये हार्ट्फ़ोड नावाच्या शहरात ही आहेत.मराठी चे अभिमानी वाचन संस्कृतीबद्दल सतत बोलत असतात.आपल्या महाराश्ट्रात अशा वाचनालयासाठी प्रयत्न व्हायला हवेत.