देव... कुठे आहे? (भाव-चिंतन-७)

देव... कुठे आहे?

देव देव्हाऱ्यात नाही
देव नाही देव्हाऱ्यात...

देव भक्तीचा जिव्हाळा
देव प्रेमाचा ओलावा II

देव आहे ठायीठायी
देव आहे भूताभूती II

देव आहे मनोमनी
देव हृदयी राहतो
देव भक्तीला भुलतो II

-रा. वा. गुणे