केशवसुमारांच्या वतीने विडंबनकाराची भूमिका मांडण्याचा एक प्रयत्न...
कविता
कधी हसते तर कधी रुसते
तसंच विडंबनही
कधी जमते तर कधी फसते
गुळगुळीत
साधं लिहिणं आम्हाला जमतच नाही मुळी
कारण सांगतो
आमची आहे अस्सल कवीची जातकुळी
उगाचच नाही
लिहित आम्ही, येते एक आंतरिक उर्मी
मग बसो
कुणाला टप्पल, थप्पड, वा घाव वर्मी
तरीही नसावा
तुमच्या आणि माझ्यात वैरभाव
आणखी काय सांगू
हीच एक कविता झाली की राव