स्वनासाठी शिर वाहिले होते ..........

मी एक स्वप्न पाहिले होते

स्वप्नासाठी शीर वाहिले होते ..........

वादळ खाऊन पचवायचे होते

मरणाच्या दारी आयुष्य वाहिले होते ..........

प्रेमापेक्षाही जे काही असेल ते ..

कोटी जन्म अर्पून अपेक्षिले होते.......

आभाळाला बनवावे दास

ह्याचसाठी कुडीत प्राण अडकले होते ....

हृदय फोडून निघावे असे शब्द ..

फक्त एका शेरासाठी हे जीवन मावळले जावे ..

तू जेत्यांच्या पंक्तीत नव्हतीस ..

मी हरलो नाही हेच चुकले होते...

( काव्यप्रकार माहीत नाही पण माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त झाल्या आहेत. मी खूप समाधानी आहे. )