किती बरं झालं असतं, आज तू इथं असतास,
निशिगंधासारखा माझ्या आयुष्यात माझ्या श्वासात फुलला असतास.
नेहमीच म्हणते ती असं त्याची आठवण आल्यावर,
अश्रूंचं आभाळ तिच्या डोळ्यांमधे दाटल्यावर.
ती मग गुंग होते त्याच्या आठवणींमधे हरवून जाते,
त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण परत जगून घेते.
आता तिच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही उरलेलं,
त्याच्या आठवणींचं पान श्वासाश्वासात विखुरलेलं..
डोळे भरून ती त्याला पाहते जेव्हा तो मोठ्या कष्टाने अश्रू आवरतो,
तिच्या फोटोला हार घालताना मात्र,
रोज त्याच्या डोळ्यांना पूर येतो...