ज्वालामुखी आणि ज्ञानेश्वर ..

एका पृथ्वीला आम्ही पेटवून दिली ..

पृथ्वी आतल्या आत धगधगू लागली ..

धगधगणं असह्य झालं तेव्हा लाव्हा बाहेर आला ..

त्या थंड झालेल्या लाव्हाला ..

आम्ही ` ज्ञानेश्वरी ` म्हणतो....