जयपुरी पनीर

  • पाव काप ..........काजू काप(अ)
  • पाव काप............ सुके खोबरे(अ)
  • १ चमचा .............खसखस(अ)
  • पाव काप ..............दूध(अ)
  • पाव काप ............दही(अ)
  • कांदा २(ब)
  • टोमॅटो २(ब)
  • अद्रक लसूण पेस्ट .........२ चमचे(ब)
  • हिरवी मिरची २-३(ब)
  • दालचिनी .................२ तुकड(ब)
  • जिरं पूड ......................१ चमचा(ब)
  • गरम मसाला ............१ चमचा(ब)
  • मीठ चवीनुसार(ब)
  • पनीर २०० ग्राम
३० मिनिटे
साधारण ४ माणसे

१) प्रथम वरील(अ) मधील साहित्य एकत्र १ तास भिजत ठेवावे आणि नंतर मिक्सर मधून काढून घ्यावे.

२) वरील  (ब) मधील साहित्य मिक्सर मधून काढावे .

३) कढई मध्ये तेल २ चमचे गरम करावे त्यात (ब) पेस्ट टाकावी, तेल सुटू द्यावे,  त्यात (अ) पेस्ट टाकावी ,आणि पनीर    तुकडे टाकावी.
   १-२ चुटकी साखर टाकावी.
    पानी टाकावे.
    उकळी आल्यावर मलई टाकावी.
     मंद आचेवर उकळू द्यावे.५ मिनिटे.

ही भाजी गरम नान सोबत छान लगते .

माझी आई