नवीन प्रयत्न आहे ''गझल'' पर्यंत पोहोचण्याचा.... मनोगतींचे मार्गदर्शन अपेक्षीत आहे.
न स्मरे अशांत हे ही मी कशास विसरून गेलो;
स्मरले जरा तुला जे, मी स्वत:स विसरून गेलो ॥
जर ज्ञात आतले होते तुज कलह काळजाचे,
हसलो असे जणू की मी कुणास फसवून गेलो ॥
बहरवयास आम्ही ही वसंत हुडकीत होतो;
कळवे ऋतु अता की मी कधीच बहरून गेलो ॥
मज दोष आसवांचा मिळो न मज खेद याचा;
कळले कुणास मी जेव्हा मनात बरसून गेलो ॥
कळते तिथेच तेव्हा येउनी थबकलीस तू ही;
वळणांवरून ज्या ज्या, मी हताश परतून गेलो ॥
नटला जिथे जसा तो, वंदिलेच परमेश्वरां मी;
सुनवेल मृत्यु उद्या की भक्तांस उचलून गेलो ॥