मेळ

लाथाडिली जरी मी मोहांची मृगजळे

पाय अजुनी तरीही का मागे रेंगाळे

मांडुनी बसतो कचकड्यांचा खेळ

भोग अन विरक्तीचा जमत नाहीये मेळ