जगलो मी अर्थपूर्ण

व्यर्थ गेले माझे आयुष्य,जगलो मी उगा

असे म्हणण्याची वेळ ,येऊ देऊ नका  

लाभलेले हे आयुष्य,गांभीर्यपूर्वक जगा

गेलेली घटिका जाऊ दे,आता तरी आनंदाने जगा

                आई-बाप,बंधू-बहीण,मित्र,बायको,नैत्रीण

                सारी नाती जपा.आनंदाने भरून टाका मन

                ''अरेरे! करावयाचे खूप होते,गेले की राहून''

                          असे म्हणत उर ,नका घेवू बडवून             

तुमचे मन ,तुमचे घर,करा स्वर्गाहून सुंदर

मृत्यूचे स्वागत करताना ही,न वाटेल हुरहूर

म्हणाल मृत्यूला तुम्ही ,''ये मृत्यो ये ,

मी आहे तयार,जगलो मी अर्थपूर्ण !''