स्त्री जन्मा....

अशीच एक सायंकाळ

उदास अन थकलेली

तीच्या रोजच्या अवकाशात

तीच एक वेळ विसाव्याची

दिवसाच्या श्रमाची

जाणीव आहे देहभर

भोगलेल्या आयुष्याचे क्षण

रेंगाळताहेत मनावर

आता होईल अंधार

अन उजळतील लख्ख दिवे

तीच्या घरात मात्र

पसरत राहील काळोख

तीच्याच मनातला

जास्त वेळ विसावणे

तिला जमतच नाही

मग करित राहील ती काही

अन चवड रचून भाकरीची

वाट पाहील रात्रीची

रात्रीच्या आठवणीने

शहारतो तिचा देह

नशिबाचे भोग अजूनही

संपत का नाहीत?

अनेक प्रश्न दाटत राहतात

मनात तीच्या काळोखा बरोबर

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

अंत नसे येई मृत्यू जोवर