मेथीचे आळण

  • १ पाव मेथी-बारीक चिरलेली
  • दही १ वाटी-(साधारण आंबट-गोड)
  • बेसन १ वाटी
  • बारीक चिरलेल्या मिरच्या,लसूण
  • तेल,मोहरी,हळद फोडणी पुरते
  • मीठ,साखर चविनुसार
१५ मिनिटे
३-४ जणांसाठी

मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यावी.एका छोट्या भांड्यात दही,बेसन एकत्र करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. हे सर्व एकजीव करावे.कढईत तेल गरम करावे. नंतर मोहरी,हळद,मिरच्या,लसूण हे सगळे टाकावे.त्यानंतर मेथी टाकावी.थोड्यावेळ परतावे. शेवटी एकत्र केलेले दही,बेसन घालावे.आवश्यकतेनुसार पाणी घालावे. जास्त पातळ करु नये.मीठ,साखर चविनुसार घालावी.थोड्यावेळ उकळू द्यावे.गरम गरम खाण्यास छान लागते.

हे आळण पुलाव अथवा मसालेभातासोबत फार छान लागते.या साठी फार गोड किंवा फार  आंबट दही वापरू नये.साधारण आंबट-गोड दही वापरल्यास छन लागते.

आई