उपवासाची रताळे भाजी

  • ४ मोठी रताळी,
  • ३-४ हिरव्या मिरच्या छोट्या कापलेल्या,
  • १/४ वाटी शेंगदाण्याचे कुट,
  • १ १/२ चमचा तेल.
  • मिठ चवीपुरते, १/२ वाटी दही.
३० मिनिटे
२ जणांसाठी

रताळी स्वच्छ धुवून घेऊन,  ३-४ तुकड्यात कापावी. कुकरला १ का शिटी लाऊन थंड झाल्यावर साल काढुन नंतर ही रताळी छोट्या तुकड्यात कापुन घ्यावी.

आता कढईत तेल घ्यावे, थोडे तापल्यावर हिरव्या मिरच्या परतुन नंतर रताळ्याच्या फोडी टाकव्या. २-३ मिनिटे परतुन मिठ व शेंगदाण्याचे कुट घालुन २-३ मि. नंतर गॅस बंद करावा.

वाढताना वरून दही घालावे. 

उपावासात साबुदाण्याची खिचडी काही तासात पुन्हा भुकेची आठवण करून देते, ही भाजी थोडी गोड असल्याने अगदी  आरामात दिवस जातो.... खात्री नाही? मग करूनच बघा तर.

स्वैंपाकघरातील माझा खटाटोप.