बुडबुडे

कनवटीस बांधून बुडबुड्यांचे बटवे

चौकात जमुनिया बसती दांभिक नटवे

प्रसविती शब्दभ्रम फसवे अन वांझोटे

कोरडेच राहतील नर्मदेतले गोटे