लोकल त्रिवेणी

लोकल त्रिवेणी

आले आले हो सॄजन ।

कुणी व्हीटी कुणी सायन ।

कुठे वाजे सायरन ।

फॅक्टरीचा ।।१।।

खिडकीची सीट ।

धरावी ना नीट ।

परि तड्फड अवीट ।

दारियाची ।।२।।

कसे ओवीचे हे कूळ ।

जात्यामधि दळे दल ।

काळ बांधे माझे कूळ ।

लोकलशी ।।३।।

__अभय अरूण इनामदार