गुरुपौर्णिमा - शास्त्रीय गायन

दिनांक २ सप्टेंबर रोजी आय. आय. टी. पवईच्या सक्सेना सभागृहात पं. रत्नाकर पै यांची गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. वेळ :- सायं. ४.३० ते १०.००. या निमीत्ताने रसिकांना  पै बुवांच्या अनेक शिष्याच्या गायनाचा लाभ घेता येईल. पं. नरेंद्र कणेकर , डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे, प्रो. मिलींद मालशे , श्री. भालचंद्र टीळक , श्रीमती‌ शाल्मली जोशी, श्री. आदित्य खांडवे ईत्यादी शिष्यांच्या गायनानंतर स्वतः पै बुवांच्या गायनाचा आस्वाद रसिकांनी जरुर घ्यावा.