जगणे म्हणजे काय ?

माणसाने कसे जगावे,याबद्दल अनेकांनी उपयुक्त लिखाण केले आहे.त्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या उपदेशांप्रमाणे आचरण केले तर पूनर्जन्माचा फ़ेरा चुकेल,असे संतानी स्पष्टच सांगितले आहे.किमान चालू जन्म तरी सुखकारक जावा,असे बहुतेक सर्वाना वाटत असते.यादृष्टीकोनांतून विचार करु जाता,संत समर्थ रामदास यांच्या ''दासबोधा''तील तपशीलवार सुचना पुरेशा आहेत,असे म्हणता येईल.पण संतांचे उपदेश हे ,सारे करून सवरून झाल्यावर ,शेवटी भजन करण्यापुरते विचारांत घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे.तसेच जीवनाकडे गांभीर्याने न बघता,''खा ,प्या ,मजा करा ''यावरच बहुतेकांचा भर आहे.यामुळे कांही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन गेले आहे.पण एवढेच म्हणजे जगणे,नव्हेच ! तुमच्या घरावर प्रेम करणे याचा अर्थ घर सुंदर स्वछ असावे म्हणून तुम्ही प्रयत्नशील असायला हवे.ते बायकोवर किंवा फ़क्त नोकरांवर सोपवणे,पुरेसे नाही.तुम्ही ज्यागावात रहाता ,तेथील रस्ते,बागा,सार्वजणिक पाणी-व्यवस्था यामध्ये ही सहभाग घेवून या सर्व गोष्टी चांगल्याच रहातील यासाठी लक्ष दिले पाहिजे‌. समर्थ रामदास स्वामीनी दासबोधामध्ये जे तपशीलवार मार्गदर्शन केले आहे,त्यानुसार वैयक्तिक आचरण केले तर आपले वैयक्तिक व सार्वजणिक जीवन नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय रहाणार नाही.यासाठी प्रत्येकाने हे माझे ही कर्तव्य आहे,असे मानून इतर कोणीतरी करेल याची वाट पाहणे बंद केले पाहिजे.यातूनच जगण्याचा खरा अर्थ उमगेल.