ये ना ..

ये ना सजना
आतुरले मन
तुझे पाहणे कोरुन घेण्या..
मम हृ्दयी या

ये ना जवळी
बावरले तन
फ़ुले जाईची गोंदुन घेण्या..
सर्वांगी या

ये ना लवकर
बोलावे वन
नाद सुरीले भरुन घेण्या..
श्वासातुन या..