नमस्कार मंडळी, मागील २ लेखांच्या ("चाय गरम" आणि "पोटपुजेतील जोड्या")चटकदार प्रतिसादावरुन खवैय्येगिरी हा वाचकांचा आवडता विषय आहे हे सिद्ध झाले आहेच. सर्व वाचकांना मन:पुर्वक धन्यवाद.
पण नुसते पदार्थांची नावे वाचुन खवैय्येगिरीचे समाधान कसे होणार? तर निवडक असे मराठी उखाणे - अर्थात ज्यात खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे अश्या संकलीत करणे आणि निखळ मनोरंजन हाच या लेखाचा हेतू .त्या साठी खवैया आणि रसिक लेखक आणि कवी मंडळी ना पुन्हा एकदा नम्र विनंती...आपल्याला माहीत असलेल्या / विडंबन केलेल्या / बनवलेले विनोदी असे उखाणे (ज्यात थोडा तरी "खाउ" आहे ) कळवावेत ही नम्र विनंती.
विनम्र- शशांक
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे , -----शी लग्नाचे नंतर बघू ,पेढ्याचे ताट आण इकडे ....