कोबी-वाटाण्याचा भात

  • वासाचा तांदूळ १ पाव
  • फ्लॉवरचे (फूल कोबी) तुकडे १ वाटी
  • वाटाणे १ वाटी
  • मसाल्याची पाने(तेजपान) ५-६
  • २-३ हिरव्या मिरचीचे तुकडे
  • आले (साधारण २ इन्च)
  • काळा मसाला १ चमचा
  • जीरे पावडर १ चमचा
  • धणे पावडर १ चमचा
  • तिखट चविनुसार
  • तेल,मोहरी,हळद फोडणीसाठी
  • मीठ चवीपुरते
३० मिनिटे
३-४ जणांसाठी

सर्वप्रथम कोबीचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत.कढईत तेल गरम करावे व कोबी तळून घ्यावी.कागदावर काढावी म्हणजे जास्तीचे तेल निघुन जाईल.त्यानंतर आले किसून घ्यावे.तांदुळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावेत.कुकर मध्ये तेल गरम करावे.त्यामध्ये मोहरी टाकावी.मोहरी फुटल्यावर त्यात मिरचीचे तुकडे,मसाल्याची पाने (तुकडे करुन),किसलेल्या आल्या पैकी थोडे आले,हळद,तिखट घालावे.त्यानंतर वाटाणे व तांदुळ घालून थोड्यावेळ परतावे. नंतर पाणी घालावे.भात मोकळा होइल इतके पाणी घालावे. त्यात तळलेली कोबी,काळा मसाला,जीरे पावडर,धणे पावडर,मीठ चवीपुरते व उरलेला आल्याचा किस घालावा.कुकरचे झाकण लावावे.२-३ शिट्या होऊ द्याव्यात.

या गरम गरम भातासोबत ताक करावे.

आई