सखे, तुझ्या आठवणीचा लहरी तो बेभान वारा.....


सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला............
कहरी त्या वा-याचा
स्वभाव होता भलताच न्यारा
उगा वेदनेचा वणवा माझ्या
मनात लावुनी गेला............

सखे, तुझी नी माझी आता
फ़क्त स्वप्नातच भेट घडते
हे गुपित आपलं कुठुनतरी
कळलय वाटतं त्याला
तसं त्याचं नी माझ
आधीच पटत नव्ह्ते
म्हणुन कदाचीत हा
आजची रात्र जागवुनी गेला............
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी तो बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला............

सखे, का गं नेहमीच हा
वारा असा वेगात सुटतो
काही काळ-वेळच नाहीये
बघ त्याच्या येण्याला
अंधा-या रात्रीस चमकता
तारा जसा नभात तुटतो
अगदी तसाच बघ हा
स्वप्न माझं तोडुनी गेला ............
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा तो
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला............

सखे, आज तु माझी
नाहीस तरी माझ्या
मनात तुझ्या प्रेमाचा दिवा
अजुनही तसाच तेवत राहतो
माझं तुझ्यावरचं प्रेम जणु काही
पहावत नाहीये त्याला
तु सोडुनी जात होतिस
तेव्हा मी रडलो नव्हतो
म्हणुन कदाचीत आज हा
मला रडवुनी गेला............
सखे, तो तेवता दिवा आज हा
वारा विझवुनी गेला............
सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी तो बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला............

सचिन काकडे [सप्टेंबर ७,२००७]