मी स्मरतो तुला अजुनही आहे....

ओठांच्या कळित हलकेच हासणे

नेत्रांचे बाण थेट हृदयात मारणे

केसांची बट सावरत लटके बोलणे
पावित्र्याची साक्ष देणारे रुप रे देखणे
त्या निरागस अदांच्या जखमा ताज्या या काळजात अजुनही आहे
.
पाहताच तुला मी मला विसरणे
न दमता ऎकणे फ़क्त तूझे बडबडणे
विरहात तुझ्या मन हे वेडे गहिवरणे
स्वप्नातही तुला आणि फ़क्त तुलाच स्मरणे
केसातल्या त्या जाईचा गंध ताजा या श्वासात अजुनही आहे
.
प्रत्येक कवितेत माझ्या फ़क्त तुझे वावरणे
त्याच कविता वाचुन मुक्त तुझे मोहरणॆ
विसरुन भान माझे डोळ्यात तुझ्या हरवणे
प्रेमाच्या छायेत तुझ्या हळुच मग विसवणे
सहवासातला तुझ्या प्रत्येक क्षण साठवला या हृदयात अजुनही आहे
.
खेटुन बसुन बाझुला माझ्या रंगी रंगणे
मुक्त तुझे ते माझ्या स्वप्नी बागडणॆ
हातात घेऊनी हात प्रेमाची वचने देणे
सुरात मिसळुनी सुर गावे सुरेल एक गाणे
ते तुझे अबोल गाणे भिणते या रक्तात अजुनहि आहे...