पुन्हा पुन्हा...

खुळेपणा माझाच मी सांभाळून घेताना...

पुन्हा पुन्हा मनातून अंधारून येताना...

का हे असे वेड त्याचे देहभर भिनावे?

का मी असे पुन्हा पुन्हा स्वतःशीच भांडावे?

कोण्या एका वाटेवर 'सखू' त्याची भटली...

आरशात बघताना ओळखीची वाटली...

नको नको म्हणताना तिने मला गाठावे...

आणि माझे रूप मला अनोळखी वाटावे...

अस्तित्वाचे असे माझ्या किती डोह अंधारे...

कळते ना खोली त्यांची; कळती ना किनारे...

बाण विचारांचे असे अंधारी त्या सोडावे...

वाटे, दिसू नये कोणा; स्वतःमध्ये दडावे !!!

********