मी विचारले एकदा
गुलाबाच्या फुलाला
मी विचारले एकदा
कट्यात फुलल्याचा
खेद नाही का तुला
काट्यात फुलल्याचा
आनंद होतोय मला
माझ रक्षण करणारा
काटा हा बोचरा
कमळाच्या फुलाला
मी विचारले एकदा
चिखलात फुलल्याचा
खेद नाही का तुला
चिखलामुळेच राहते
माझी अबाधित निर्मळता
ताठ उभं रहायला
आधार त्यचाच होता
मोगर्यच्य फुलाला
मी विचारले एकदा
रंग नसल्याचा
खेद नाही का तुला
रंग नसल्याची
नाही मला खंत
सुगंधी ओळख सांगतो
दरवळणारा आसमंत
प्राजक्ताच्या फुलाला
मी विचारले एकदा
झाडावरून पडल्याचा
खेद नाही का तुला
फार होतात वेदना
झाडावर सुखतांना
क्षणार्धात मृत्यू येतो
मातीत मिसळतांना