एक एक पाकळी
म्हणते आम्हीही फूल होतो कधीकाळी
आज जरीही आहे फक्त पाचोळा
आमचेही होते वय कधीतरी सोळा
जसजसे दिवस सरले
पराग, रंग, सुवास काही न ऊरले
सर्वानीच सोडली साथ
राहिले न ते कमलनयन अन् कुंदकळ्यापरी दात
आपल्या हाती काहीच नसतं
मुठीतल्या वाळूसारख जिवन असतं
घट्ट आवळली मुठ जरी
जाईल गळून एक दिवस श्वासापरी
जोवर आहे श्वास जिवन जगायच असतं
कारण शेवटी आपल्या हाती काहीच नसतं
हातात काही नसल तरी प्रयत्नातून नंदनवन फुलते
आणी पुन्हा एकदा फुल वेलीवर डुलते
फूल कधी विचार करत नाही
होणार आहे पुन्हा माझा पाचोळा
जिवन चक्र असेच चालू राहील
रम्य पहाट कधी ,अंधार कधी कुट्ट काळा.....
पुन्हा होईल उद्या नवी पहाट
पुन्हा दिसेल नवी वाट
उद्याचा आशावाद हेच जिवन आहे
तो नसेल तर आजचे जगणे सुध्दा मरण आहे......