गोडी अपूर्णतेची,अहाहा! काय वर्णावी?

गोडी अपूर्णतेची,अहाहा! काय वर्णावी?
अष्टमीचा चंद्र ,अर्धी उमललेली कळी,यांचे वर्णन कवी-साहित्यिकांनी अनेकविध प्रकारे करुन ठेवलेले आहे.पण वैयक्तिक जीवनातही अपूर्णतेचाच जणू
प्रत्येकाला ध्यासच लागून राहिलेला दिसतो.करताना अनेक गोष्टी अर्धवट करायच्या आणि तरीही श्रेय मात्र पूर्ण घ्यायचे,असा मानवाचा स्वभावच् झालेला आहे.पण त्याला तू अर्धवट आहेस,असे म्हटलेले मात्र चालत नाही.
     वैयक्तिक जीवनात तो आळशी,निरुत्साही असतो.योग्य -अयोग्य,आवश्यक-अनावश्यक हे कळत असूनही तो अनेकदा योग्य,आवश्यक गोष्टी न करता,अनावश्यक,अयोग्य गोष्टी करतो.उदा:-सकाळी लवकर उठणे,व्यायाम करणे,स्वत्:च्या शरिराला पचेल-अपचण होणार नाही,असेच पदार्थ खावेत
वेळच्या वेळी त्यात्या गोष्टी कराव्यात इ.त्याला कळत असूनही नेमके याविपरित आचरण माणसे करतात.
   आपण ज्या गल्ली,गाव,शहरात रहातो तेथील स्वच्छता,आरोग्य यामध्ये आपला वैयक्तिक,कुटूंबातील व्यक्तींचा सकारात्मक सहभाग आवश्यक असतो हे माहीत असूनही त्यामध्ये सहभाग न घेणे;उलट अस्वच्छता-अनारोग्य वाढीस लगेल असे आचरण आपणाकडून होत असते.नियमांचे पालन केल्याने
सर्वाना फ़ायदा मिळतो,हे ठाउक असूनही नियम मोडण्यातच धन्यता मानणारे जास्त लोक असतात.
   पूर्ण ज्ञान जणू कोणी घ्यायचे नाही,अशी आपली शिक्षण विषयक धारणा कि धोरण असावे ! विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवावेत ,अशी पद्धती नाहीच.३५ गुणाला उत्तीर्ण असे ज्या कोणी ठरवून दिले असेल,त्यामहाभागाला मात्र स्वत्:ला ३५%श्रेय घेणे आवडले नसेल.फ़ळे लटकता आहेत,त्याफ़ांदीपर्यंत तरी झाडावर चढणे आवश्यक असते.तेथे भू-पातळी व फ़ळापर्यंतच्या ऊंचीपैकी एक-तृतीयांश उंचीपर्यंत चढणाऱ्यला त्याफ़ळाचा किंवा तेथील एकून फ़ळापैकी एक-तृतीयांश मिळू शकेल का ? हे प्रत्यक्षातील सत्य सर्वाना ठावुक आहे,पण ...!
   पालक मुलाना शाळेत घालतात,तेव्हा पासून त्यामुलाकडून फ़क्त एकच अपेक्षा असते,ती म्हणजे त्याने मन लावून फ़क्त अभ्यास करावा .बहूसंख्य मुले फ़क्त शाळा करतात.पण शाळा बुडविणे,दंगामस्ती करणॆ,आणखी अनेक प्रकारे ही मुले आपले शालेय जीवन व्यतीत करतात.पण पूर्ण पणे अभ्यासाकडे फ़ार थोड्य़ा मुलांचे लक्ष असते.
     जीवनातील त्या त्या अवस्थे मध्ये करावयाचे कर्तव्य पार पाडण्यात बहूदा सर्वजण अपुरे पडतात.मुलगा/मुलगी ,पती/पत्नी ,माता/पिता ,
सेवक/धनी ,नेता/राज्यकर्ता यांचे आचरण परिपूर्ण नसतेच.सारे यंत्रवत जगत असतात.पूर्णत्वाचा ध्यास कोणाला आहे, असे दिसत नाही.
मागील काही शतकापासून सर्वात चांगली,कमीत कमी दोष असलेली,सर्वाना समान अधिकार देणारी,सर्वांच्या वैयक्तिक विचार स्वातंत्र्याला वाव देणारी,सर्वांचा समान विधायक विकास साधणारी शासन पद्धती म्हणून लोकशाही ही जगातील अनेक देशात स्विकारलेली आहे.पण यामध्येही अनेक उणीवा ठेवल्या आहेत.लोकशाहीमध्ये मताचा अधिकार तर सर्वाना दिला,पण खरोखरच सर्वानी मतदान करावे हे अपेक्षित नाहीच.निवड बहूमताने म्हणजे किती हे नक्की नाहीच.संपूर्ण गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला तरी फ़रक पडत नाही.एकून मतदारसंख्येच्यापैकी किती मतदारानी मतदन केले तर ती निवडनूक वैध मानावी,किमान किती मते मिळवल्यानंतर त्या प्रतिनिधीची निवड झली ,असे मानावे याबद्दल स्पष्टता नाहीच.अलिकडील काळात भारत देशात युती किंवा आघाडी म्हणून जो प्रकार आहे ,तो म्हणजे उपवर मुलीला योग्य तरूण उपलब्ध होत नाही म्हणून अल्प वयाच्या तीन/चार मुलांसोबत तिचे लग्न लावून देणे ,होय.
      भारत देशात इंग्रजीतील सेक्यूलर शब्दास प्रतिशब्द असलेली धर्मनिरपेक्षता स्विकारण्यात आली आहे.धर्मनिरपेक्षता म्हणजे असंख्य जाती,पोट्जाती,धर्म यांचे किळसवाणे ,महाभयंकर जंतूचे आस्तित्व मान्य करणे.जन्माच्यानोंदीपासून जात/धर्माची नोंद करावी लागते.हे जंतू प्रतिदिनी
भारतातील समाज-जीवनात अनारोग्य निर्माण करत आहेत.तरीही या धर्मनिरपेक्ष्तेच्या कर्क रोगाला ह्या देशातील स्वार्थी आणि नपुंसक राजकारणी
व्यक्ती कवटाळून बसलेच आहेत.इथल्या सामान्य माणसांच्या हातात बघत रहाणे एवढेच् आहे.
आता मी ही हा लेख असाच अर्धवट सोडतॊ आणि ..... म्हणूनच शिर्षक - गोडी अपूर्णतेची !