मी जातांना
"थांब" मला म्हणशील का?
काळ्या डोळ्यात तुझ्या
आसवे येतील का?
मी गेल्यावर
आठवण माझी काढशील का?
सोबत काढलेल्या दिवसांचे
स्मरण तुला होइल का?
तुझ्या ओठांवर
गीत माझे येतील का?
भाव माझ्या मनातले
शब्दातुन कळतील का?
माझे प्रेम
मी गेल्यावर समजेल का?
साद दिली तर
प्रतिसाद मला देशील का?